Select Page

चार गोष्टी गमतीच्या..

Bandhu.. बंधू..

त्याच खरं नाव रमेश. हे माहिती असलं, तरी आजही बंधूं म्हणताच जे जास्त नॉस्टॅल्जिक होतात, ते नक्की त्याच्या बुर्जीच्या गाडीवर जाणारे. पुढं त्याच बंधू.. हेच नाव रुढ झालं. पुण्यात कॉट बेसिसवर राहून कॉलेज शिकायचे दिवस होते. मेसला भाजी बंडल असल्याची खबर लागली, तर नाईलाजाने जेवण बुडवावे लागायचे. मग रात्री दहाला पावलं, एसपी कॉलेज पोस्ट ऑफिस बाहेरच्या बंधूंच्या बुर्जीच्या गाडीकडे वळत. काहीवेळा या बुर्जीसाठीसुद्धा मेसला दांडी पडत असे. जेवण झालेलं असलं तरी सुद्धा सिंगल आम्लेट चालवायचो.

पुण्यातले सायकलींचे दिवस होते, रस्त्यावर रात्री रहदारी कमी झालीतरी, बंधूच्या गाडी भोवती गिऱ्हाईकांची आणि त्यांच्या सायकलींची गर्दी. कालांतराने आमची ऑर्डर सांगून आम्ही थेट मागच्या बँकेच्या पायऱ्यांवर बसत असू. बाकी आमची बडबड आणि चर्चा यातून, भुकेची जाणीव झाली की, ओ बंधू.. कुठपर्यंत आलं? असं कोणीतरी विचारत असे. हो.. झालंच, दहा मिनिटात देतो. असं ठरलेलं आश्वासक उत्तर यायचं.

 बंधूंची बुर्जीची गाडी स्वच्छ होती. बंधू सगळी कामं सिस्टिमॅटिक करत असायचा. यामुळं जरी वेळ लागला तरी तिथं गिर्हाईक थांबून राहायचं. गाडीच्या डोलाऱ्याच्या मागे उभा असलेला, तो बत्तीच्या प्रकाशात कमी दिसायचा, इतकी गर्दी तिथं कायमच असायची. तसं त्याच वर्णन करायचं, तर बुटकेलासा, कुरळे केस, या पलीकडं त्याच सखोल वर्णन कोणी करु शकेल, असं मला वाटत नाही. पण बंधू सगळ्यांना प्रिय होता. उभ्या गडू सारख्या भांड्यात अंडी फोडून, मसाले कांदा वगैरे घालून भरपूर हलवलेलं ते मिश्रण एकदा फ्रायपॅन मध्ये पडलं, की मग त्याची एका बाजूला स्वच्छता सुरु व्हायची. मॉडर्न बेकारीच्या स्लाइस पावाचे कागद नीट घडी करून ठरल्या जागी ठेवणे. पार्सलवाल्या गिऱ्हाईकाला पार्सलसाठी ते उपयोगी पडत.

आधी ज्याला बुर्जी दिली असेल त्याला, काय बंधू? ओके आहे ना? असं विचारलं जायचं. मधेच बॉइल्ड अंड्याची प्लेट तयार करुन कुणाला तरी दिली जायची. पण बंधूंची पॅनमध्ये तेल ओतायची स्टाईल भारी होती. एका लयबद्ध हालचालीत त्याच काम सुरु असायचं. अगदी मौल्यवान काही टाकत आहे, असं तो तेल टाकायचा. मी शेडगेवाडीत राहत असल्यानं, रोज संध्याकाळी तो पेरुगेट जवळच्या मॉडर्न बेकरीतून त्याचे पाव घेऊन, सायकलीच्या दोन्ही बाजूला कॅनव्हासच्या पिशव्या लावून, टिळकरोडकडे जाताना दिसायचा तेंव्हाच तो संपूर्ण अवतारात दर्शन द्यायचा.. गाडीवर उभा असल्यावर मात्र त्याचं डोकं दिसायचं.

पुढे कॉलेज संपलं, मग उद्योगाचे दिवस सुरु झाले. याकाळात बंधू बरेच दिवस गायब होता. मग बरेच वर्षांनी, त्याला टिळकरोवरुन जाताना बादशाहीच्या फुटपाथवर गाडी लावलेला बघितला आणि का कोण जाणे, हायसं वाटलं. कॉलेज संपल्यावर शेडगेवाडी सुटली आणि सगळंच बदलून गेलं. कुणीतरी म्हणून ठेवलयं, हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो. ते आमच्या बंधू कडून आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं.

AI car modification · jojobet · buy backlinks · dofollow backlinks · link building service · buy backlinks · buy quality backlinks · winandoffice · aiswapface — Guide: Video to GIF · buy backlinks · link building service · dofollow backlinks · buy quality backlinks · dofollow backlinks · guest post service · hacklink satın al · backlink seller · hacklink panel satın al · hacklink satın al · hacklink panel satın al · jojobet · jojobet · jojobet · jojobet · jojobet